Posts

Showing posts from July, 2023

#किस्सेकोर्टातले #सही करण्याआधी खात्री करा.. ऍड. रोहित एरंडे. ©

  #किस्सेकोर्टातले #सही करण्याआधी खात्री करा.. नाते आणि व्यवहार ह्यात गल्लत नको..  ऍड. रोहित एरंडे. ©  कोर्टामध्ये लोकांचे मुखवटे गळून खरे चेहरे बरेचदा समोर येतात. "आपले" लोकं असे कसे वागू शकतात, ह्या प्रश्नावर बरेचदा उत्तर नसते आणि आपले "प्रेम" आडवे येते. असे गमतीने म्हणतात कि महिनाभर बदाम खाऊन जेवढी अक्कल येत नाही तेवढी  अक्कल एका विश्वासघातात येते ! एक दिवस एका  आजोबा आमच्या ऑफिस मध्ये आले. म्हणाले माझे वय ८५ आहे. मला २ मुले आणि २ मुली आहेत.  थोरली  मुलगी पुण्यात  राहते जी माझ्याकडे बघते, बाकीचे तिघे अमेरिकेत असतात. सगळे पैसेवाले आहेत आणि आपापल्या संसारी सुखी आहेत !.थोरल्या मुलीचा तर स्वतःचा बंगला देखील आहे.  मी एकटाच माझ्या फ्लॅटमध्ये राहतो. पण  थोरलीने  मला फसविले आहे असे मला वाटते आहे कारण  माझ्या फ्लॅटची  ह्यावर्षीची प्रॉपर्टी टॅक्सची पावती  पाहिल्यावर लक्षात आले कि त्यावरून माझे नाव जाऊन तिचे नाव कसे आले ?  मी तर रजिस्टर  विल करून ठेवले आहे आणि त्यामध्ये माझ्या सर्व मुलांना माझ्या सर्व प्रॉपर्टी मध्ये समान हक्क देऊन ठेवला आहे आणि मी मेल्यावरच ते इफेक्ट मध्ये

#किस्सेकोर्टातले #आईवडील का #करिअर ? ॲड. रोहित एरंडे. ©

#किस्सेकोर्टातले #आईवडील का #करिअर ? ॲड. रोहित एरंडे. © मुले परदेशात आणि आई वडील इथे, असे चित्र आता घरटी बघायला मिळते. स्वतःचे करिअर, आयुष्य असतेच पण त्यापुढे आई वडिलांप्रती  कर्तव्ये दुय्यम असतात आणि तुमचे तुम्ही बघा  असे वाटणारे प्रसंग वकीली व्यवसायात कधी कधी बघायला मिळतात. त्यातील हा एक.. तीनही मुले उच्च शिक्षित आणि 'Uncle Sam' च्या देशात स्थायिक.. आई वडील ५ स्टार वृद्धाश्रमात.. आमच्या पक्षकारांनी त्या आई वडिलांचा एक मोठा ३ बी.एच. के. फ्लॅट विकत घ्यायचा ठरविला, जो त्यांनी ३  मुलांसाठी ठेवला होता... व्यवहार ठरला. किंमत ठरली. त्याच सुमारास ' दैवयोगाने ' मोठा मुलगा त्याच्या एका कॉन्फरन्स साठी २ दिवसांसाठी पुण्यात येणार होता.    आमचा रजिस्टर  करारनामा बँकेत दिल्यावर बँक त्यांना डी.डी. देणार होती आणि मग आम्हाला ताबा मिळणार होता.  ह्या सगळ्या प्रकारात मुलगा त्याच्या कामात बिझी होता आणि तो दुसऱ्या दिवशी आई वडिलांनी फ्लॅटचा ताबा आमच्या पक्षकारांना देण्याच्या वेळी, फ्लॅट वरच आई वडिलांना उभ्या उभ्या भेटून तिथूनच मुंबईला जाणार होता, कारण दुसऱ्या दिवशीचे पहाटेचे त्याचे बिझनेस क्

#डिव्होर्स #काहीअनुत्तरितप्रश्न ? #सुन्न करणारे अनुभव ! - ऍड. रोहित एरंडे. ©

#किस्सेकोर्टातले #शिकण्यासारखे  #डिव्होर्स #काही#अनुत्तरित#प्रश्न ? #सुन्नकरणारे #अनुभव ! ऍड. रोहित एरंडे.  © ५-६ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. आमच्या एका जुन्या  क्लायंटचा फोन आला कि त्यांच्या ऑफिसमध्ये की बाई काम करतात त्यांच्या मुलीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही मदत कराल का  ? ठरलेल्या वेळेला त्या बाई, त्यांची मुलगी  आणि तिचा नवराहि असे तिघे आले. त्यांच्या लग्नाला फक्त अडीच वर्षे झाली होती आणि  प्रॉब्लेम होता कि  त्या मुलीचे आणि तिच्या नवऱ्याचे सुरुवातीपासूनच काही पटत नव्हते . सतत भांडणे , एकमेकांच्या आई-वडिलांचा उद्धार नेहमीचाच. मी विचारले नक्की काय झाले ? त्या दोघांचे  उत्तर होते 'आमचे पटत नाही आणि आता परस्पर संमतीने डिव्होर्स घेऊन वेगळे व्हायचे आहे ". . मी विचारले , काही मूल -बाळ ? ,'सर,  १ मुलगा  आहे ४ महिन्यांचा ' .म्हटले अहो तुम्ही दोघे आता नवीन पिढीचे आहेत, जर तुमची भांडणे व्हायची मग चान्स का घेतलात  ? त्यावर 'घरच्यांचे प्रेशर' असे मुलाने उत्तर दिले. !!. 'मग एवढ्या छोट्या बाळाची  त्याची कस्टडी कायद्याने आमच्या अशिलांकडेच  -आईकडेच राहील', मी

मी तुला वरले कारण.. (सत्यघटनेवर आधारित ) Adv. Rohit Erande

  मी तुला वरले कारण.. (सत्यघटनेवर आधारित ) ॲड. रोहित एरंडे. © लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघेही परत फिरायला महाबळेश्वरला गेले होते. प्रसिद्ध सनसेट पॉइंट बघता बघता त्याने तिचा हात घेऊन विचारले, सांग ना - तू मलाच का वरलेस? काय पाहिलेस तू माझ्यात ? तू खूप वेळा विचारून काही सांगितले नाहीस. ती - खरच उत्तर देऊ ? -, तो - अजूनही प्रेमाने, खरं आणि खरंच.. ती : अरे, मी तीन मुले शॉर्टलिस्ट केली होती आणि मी कन्फ्युज झाले की कोणाला अखेर वरायचे, कारण तुम्ही सगळे गुणसंपन्न होतात. तो - मग, तो लकी माणूस मी कसा ठरलो ? ती - अरे मग मी आमच्या नेहमीच्या देवळात गेले, तिथे तीन चिठ्ठ्या हातात ठेवल्या, आणि एका भक्ताला सांगितले की कृपया एक चिठ्ठी उचला, आणि ती चिठ्ठी तुझ्या नावाची निघाली... आणि तिकडे ' सूर्यास्त ' झाला... ॲड. रोहित एरंडे. ©

बँक लॉकर उघडला आणि.. ऍड. रोहित एरंडे ©

Image
  बँक लॉकर उघडला आणि.. ऍड. रोहित एरंडे © रुक्ष वाटणाऱ्या, किचकट कायद्यांचा अभ्यास कराव्या लागणाऱ्या वकीली व्यवसायातही कधी कधी हसवणुकीचे / मजेशीर प्रसंग येतात.. आणि कोर्टात माणसांचे मुखवटे गळून खरे चेहरे दिसून येतात.. एखाद्य जागेची पाहणी करण्या करता, एखादा साक्षीदार आजारपणामुळे कोर्टात साक्ष घ्यायला येऊ शकत नसेल, तर त्याची साक्ष नोंदवायला "कोर्ट कमिशनर" ची नेमणूक केली जाते. थोडक्यात एखाद्या वकीलाची नेमणूक कोर्ट अशी कामे करण्यासाठी करते आणि बहुतेकवेळा ज्युनिअर वकीलांना असे काम दिले जाते. जेणेकरून त्यांना अनुभवही मिळतो आणि कामाचे थोडे पैसेही मिळतात. अशीच वकिलीची उमेदवारी करताना मला एका कामामध्ये कोर्ट कमिशनर म्हणून नेमण्यात आले. विषय होता वारसा हक्क प्रमाणपत्र (सक्सेशन सर्टिफिकेट ) मिळण्याचा. आपल्या कैलासवासी वडिलांच्या बँक लॉकरमध्ये काय काय ठेवले आहे हे बघण्यासाठी त्यांची चारही मुले उत्सुक होती, परंतु लॉकर एकट्या वडिलांच्या नावाने असल्यामुळे चावी असून देखील लॉकर उघडता येत नव्हता आणि बँकेने देखील वारसा हक्क प्रमाणपत्र आणण्यास सांगतिले होते. त्यामुळे कोर्टाने माझी "कोर्ट कम

ताबा माझाच... ऍड. रोहित एरंडे © पुणे.

Image
  ताबा माझाच... (कोर्टातील बरेच वाद हे जागेचा ताबा वाचवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी असतात आणि म्हणूनच कायद्यामध्ये ताब्याला १० पैकी ९ मार्क असे का म्हणतात ते ह्या मजेशीर प्रसंगातून कळेल. ) ऍड. रोहित एरंडे. © मागे आपण बँक लॉकरचा मजेशीर किस्सा वाचला. आता लोकाग्रहास्तव परत एकदा असाच एक पोट धरून हसविणारा किस्सा सांगतो. मानवी स्वभावाच्या खऱ्या पैलूंचे दर्शन कोर्टामध्ये होते. सगळ्यांचे मुखवटे तिथे गळून पडलेले असतात. कोर्टातील विविध दाव्यांपैकी घरमालक -भाडेकरू ह्यांच्यामधील दावे पूर्वी खूप हिरीरीने भांडले जायचे आणि कधी कधी कारणे देखील खूप मजेशीर असायची/. अर्थात आता जुने वाडेच राहिले नसल्याने ह्या केसेस कमी झाल्या आहेत. असो. काही वर्षांपूर्वी पुणेरी बाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पेठेमधील एका जुन्या वाड्यातील जागेची केस आम्ही घरमालकातर्फे लढवत होतो . ह्या केस मध्येएक मजेशीर प्रश्न उद्भवला की वाड्यामधील सामाईक संडास कोणाच्या ताब्यामध्ये आहे. आचार्य अत्रे म्हणायचे तसे जुन्या वाड्यांमध्ये आत गेल्या गेल्या डावी-उजवीकडे 'जय-विजय' सारखे संडास तुमचं स्वागताला असायचे.

इगोच्या भांडणात जो हरतो तो जिंकतो, ...पण लक्षात कोण घेतो.. (कोर्टातील कटू सत्य)

 #गोष्ट दोन सख्ख्या भावांची.  #इ गोच्या भांडणात जो हरतो तो जिंकतो, ...पण लक्षात कोण घेतो.. (कोर्टातील कटू सत्य) ॲड.रोहित एरंडे.© दोन सख्खे - ज्येष्ठ नागरिक -उच्च विद्याविभूषित भाऊ. वडिलांनी बांधलेल्या एकाच बंगल्यात खाली वर राहणारे. पण जागेवरून भांड भांड भांडले. सासू कडे कोण बघणार म्हणून दोन्ही जावा जावांमध्ये भांडणे. सर्व प्रकारच्या तक्रारी कोर्टात करून झाल्या. अखेर मोठ्या भावाला शेवटच्या स्टेजचा कॅन्सर झाला. आम्ही भेटायला गेल्यावर हातात हात घेऊन, डोळ्यात पाणी आणून म्हणले, वकील साहेब, तुमचे तेव्हा ऐकले असते की 'कशाला कोर्टात भांडताय, एक पाऊल मागे घ्या,' तर बरे आले असते., "आज माझा सख्खा भाऊ पण मला बघायला आला नाही. उगाच आयुष्यभर भांडलो, २ कुटुंब दुरावली.. पण आता वेळ गेल्यावर काय उपयोग ?" कोर्टातील काय किंवा कुठलेही, बहुतांशी वाद हे इगो मुळे झालेले असतात, पण त्यातील फोलपणा कळेपर्यंत वेळ गेलेली असते. ॲड. रोहित एरंडे © पुणे.

(पण तिला ) लग्नात सगळे दिले आहे म्हणून... ॲड. रोहित एरंडे. ©

#किस्सेकोर्टातले (पण तिला ) लग्नात सगळे दिले आहे म्हणून... ॲड. रोहित एरंडे. © वडिलांना हाताला धरून ती माझ्या ऑफिस मध्ये आली. वडिलांना बसतानाही धाप लागत होती. सख्खा धाकटा भाऊ परदेशी असल्यामुळे, आपल्या नोकरीच्या व्यापातूनही, तीच वडिलांची काळजी घेत होती. वडिल मृत्यूपत्र करण्यासाठी आले होते. त्यांनी तिला हळूच बाहेर जायला सांगितले. मग एका कागदावर त्यांनी कोणाला काय काय द्यायचे लिहून आणले होते. त्यातील एका वाक्याने मी आश्चर्यचकित झालो. "मी मुलीला तिच्या लग्नात सगळे काही (म्हणजे दागिने इ.) दिले आहे आणि लग्नाचा खर्चही केला आहे, म्हणून मी तिला काही देऊ इच्छित नाही आणि तिनेही हे गोड मानून घ्यावे". अर्थातच सर्व मिळकती त्यांनी कोणाला दिल्या असतील हे सांगायची गरज नाही. मी त्यांना न राहून विचारले, मुलाचे लग्न कसे केले, त्यावर लगेच ते म्हणाले , अर्थातच धूम धडाक्यात, भरपूर खर्च केला, आमचा एकुलता एक मुलगा आहे तो.. मग मुलीला हाक मारली आणि तिचा हात धरुन पुढच्या डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट साठी निघाले... आपली स्वकष्टार्जित मिळकत कोणाला द्यायची हा ज्याचा त्याचा हक्क असतो आणि म्हणूनच मृत्यूप