#डिव्होर्स #काहीअनुत्तरितप्रश्न ? #सुन्न करणारे अनुभव ! - ऍड. रोहित एरंडे. ©

#किस्सेकोर्टातले #शिकण्यासारखे 


#डिव्होर्स #काही#अनुत्तरित#प्रश्न ? #सुन्नकरणारे #अनुभव !


ऍड. रोहित एरंडे. ©


 काही  वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. आमच्या एका जुन्या  क्लायंटचा फोन आला कि त्यांच्या ऑफिसमध्ये ज्या  बाई काम करतात त्यांच्या मुलीचा काहीतरी   प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही मदत कराल का  ?. मी सांगितलेल्या वेळेला त्या बाई, त्यांची मुलगी  आणि तिचा नवरा असे तिघे ऑफिसमध्ये आले. त्यांच्या लग्नाला फक्त अडीच वर्षे झाली होती आणि  प्रॉब्लेम होता कि  त्या मुलीचे आणि तिच्या नवऱ्याचे सुरुवातीपासूनच काही पटत नव्हते. सतत भांडणे, हमरी -तुमरी वर येणे आणि   एकमेकांच्या आई-वडिलांचा उद्धार तर नेहमीचाच. 

मी विचारले नक्की काय झाले ?  तर त्या दोघांचे  उत्तर होते 'आमचे पटत नाही आणि आता परस्पर संमतीने डिव्होर्स घेऊन वेगळे व्हायचे आहे ". . मी विचारले , काही मूल -बाळ ? ,'सर,  १ मुलगा  आहे ४ महिन्यांचा' ' .म्हटले अहो तुम्ही दोघे आता नवीन पिढीचे आहेत, जर तुमची भांडणे व्हायची मग चान्स का घेतलात  ? त्यावर 'घरच्यांचे प्रेशर' असे मुलाने उत्तर दिले. !!. 'मग एवढ्या छोट्या बाळाची  त्याची कस्टडी कायद्याने आमच्या अशिलांकडेच  - आईकडेच राहील', मी सांगितले.. 

पण पुढचे उत्तर ऐकून मीच  हादरलो.. " सर,मला कस्टडी वगैरे काही नको ,आणि हे मी हृदयावर  दगड ठेवून सांगतेय". . क्षणभर एकदम शांतता पसरली. मी विचारले, अहो तुम्ही काय म्हणताय तुम्हाला तरी समजतय का ? , तुम्ही आई आहात त्याची  आणि तुमच्या भांडणात त्या  मुलाचा  काय दोष ?, आजच काही ठरवायला पाहिजे असे अजिबात नाही नाही"..  मी त्या मुलीच्या आईकडे आणि नवऱ्याकडे  पहिले.. मुलीची आई खाली मान घालून बसली होती.  


मग मी त्या मुलीच्या नवऱ्याला विचारले कि तुमचे काय मत आहे ? तो म्हणाला, "काही काळजी नाही सर मला द्या कस्टडी".. "अहो पण एवढ्या लहान मुलाला , तुम्ही नक्की  सांभाळणार का  ?" मी विचारले.. 'त्यात काय सर, माझी आई आणि आजी आहेत ना घरात, त्याच  सांभाळतील आणि  ते नेस्टले कंपनीची का कुठली  दुधाची पावडर असे  काहीतरी मिळते लहान मुलांसाठी  ती देऊ ना त्याला, आणि तो  तर आमच्या घराण्याचा वंशज आहे तो आमच्याकडेच वाढेल ".. बर आणि तुम्ही काय बघणार, ? मी विचारले    "सर, अहो मी कशाला सांभाळू, हे काम बायांचे आहे, आपले नाही  !!"  


मी सर्वांना परत १५-२०  दिवसांनी बोलावले, विचार केला कि काहीतरी मतांमध्ये फरक पडला असेल , पण नाही, प्रत्येक जण ठाम होता. त्यांना सांगितले कि तुम्ही दोघांनी मानसोपचारतज्ञांची   मदत घ्या , तर उत्तर आले, 'सर आम्ही काही वेडे आहोत का ?'..   शेवटी जे घडायचे ते घडतेच..   आम्ही सर्व सोपस्कार पार पाडून परस्पर संमतीने डिव्होर्स मिळावा म्हणून  केस दाखल केली आणि तो ६ महिन्यांनी मंजूर झाला.. . 


हा सर्वच प्रकार सुन्न करणारा होता. मनात काही अनुत्तरित प्रश्न आले, कि ४ महिन्यांचे ते पोर आई विना वाढणार, ज्यात  त्याचा काही दोष नाही. कितीही भांडणे असली तरी कोणती आई, एवढ्या लहान मुलाला सोडून जाईल ? नक्की काय घडले असेल ?  मूल वाढवण्याची जबाबदारी हि काय फक्त वडिलांचीच आहे का ?  मुलाच्या ऐवजी मुलगी असती तर नवऱ्याने सांभाळली असती का ? एवढी भांडणे होत  होती तर मूल  का होऊन दिले ? जी मुलगी ठामपणे  कस्टडी नको असे आता म्हणते, ती 'मला इतक्यात मूल नको'  हे का नाही म्हणू शकली ? वेळीच काउंसेलिंग घेतले असते, तर दोघांचे मत-परिवर्तन झाले असते का ?  


पण बहुतांशी वेळा डिव्होर्स केसेसमध्ये खरे कारण काय आहे हे शेवटपर्यंत वकीलांनाही कळत नाही, असे त्यावेळीही वाटले. 


डिव्होर्स किंवा घटस्फोट हा आता "टॅबू " राहिला नाही. काही वर्षांपूर्वी हा प्रकार जेव्हा कोणाच्या कोणाच्यातरी बाबतीतला डिव्होर्स ऐकू यायचा, तो तुमच्या आमच्या  घरापर्यंत कधी येईपर्यंत पोहचला हे कळलेच नाही. डिव्होर्सचे प्रमाण आता खूप वाढले आहे, रोज किती केसेस कोर्टात दखल होतात हे बघून तर विश्वास बसणार नाही. डिव्होर्स हा विषयही असा आहे कि प्रत्येक केसच्या फॅक्टस वेगळ्या असतात आणि त्यामुळे कोणताही स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला किंवा सब घोडे बारा टक्के असे करता येत नाही. आमच्याकडे येणाऱ्या पक्षकारांचे आम्ही आमच्या परीने समुपदेशन करायचा प्रयत्न करतो आणि वैवाहिक समुपदेशक किंवा गरज वाटल्यास मानसोपचारतज्ञांकडे जाण्याचाही आवर्जून साल देतो, पण प्रत्यक्षात खूप कमी लोकं जातात कारण लोकमधेय असा मोठा गैरसमज आहे कि मानसोपचारतज्ञांकडे  फक्त वेड लागलेली, डोक्यावर परिणाम झालेलीच लोकं जातात. आपल्याला अश्या सल्ल्याची गरज आहे हे खूपदा  लोकांना पटतच नाही.    असो. वकील म्हणून आम्ही आमचे काम करत असतो , पण आम्ही कोर्टात  लोकांचे  प्रॉब्लेम  मानसिक यातना - ताण लोकांना असतात हे बघून, राहून राहून आपले प्रश्न क्षुल्लक  वाटायला लागतात   ह्यासाठी परमेश्वराचे कायमच आभार मानतो अन आधि कोणावरही वेळ येऊ नये हि प्रार्थना करतो  !!


हे सर्व लिहायचे कारण एवढेच, कि इतरांनी यावरून  बोध घ्यावा ! भांडणे होत नाहीत असे जोडपे नसेलच. इतकेच काय तर जे लिव्ह-इन-मध्ये राहतात त्यांच्यामध्ये देखील भांडणे -मतभेद हे आलेच. पण कुठल्याही भांडणात मागे ते घरगुती असो वा अगदी सोसायटीमधील,  'A stitch in time saves nine" - योग्यवेळी केलेले योग्य प्रयत्न हि परिस्थिती बदलू शकतात, हे  लक्षात ठेवावे आणि आपल्याच्याने भांडणे सुटत नसतील तर तज्ञ व्यक्तींची मदत घेण्यास कमीपणा वाटू नये. पण  खूपदा  "Bad  marriage or  a  divorce"  हा चॉईस करण्याची वेळ आपल्यावर येते आणि मग तेव्हा जो निर्णय घ्याल त्याची सर्व जबाबदारी , परिणाम निभावून घेण्याची तयारीही आपली असायला हवी. 


 


ऍड. रोहित एरंडे.©

Comments

  1. That was a very good article. I really loved the way you explained the articles. Apart from this, I need your expertise in judging my article, as you are an experienced lawyer. you can also see the articles written by me and give me a review on that Section 313 of Indian Penal Code However, this provision of the IPC has been changed to Section 87 of Bhartiya Nyaya Sanhita. You can also check Section 87 Bhartiya Nyaya Sanhita

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

#किस्सेकोर्टातले. जिवंतपणी अन्न-अन्न आणि मेल्यावर पिंडदान..- ऍड. रोहित एरंडे ©

#किस्सेकोर्टातले #आईवडील का #करिअर ? ॲड. रोहित एरंडे. ©

इगोच्या भांडणात जो हरतो तो जिंकतो, ...पण लक्षात कोण घेतो.. (कोर्टातील कटू सत्य)