(पण तिला ) लग्नात सगळे दिले आहे म्हणून... ॲड. रोहित एरंडे. ©
(पण तिला ) लग्नात सगळे दिले आहे म्हणून...
ॲड. रोहित एरंडे. ©
वडिलांना हाताला धरून ती माझ्या ऑफिस मध्ये आली. वडिलांना बसतानाही धाप लागत होती. सख्खा धाकटा भाऊ परदेशी असल्यामुळे, आपल्या नोकरीच्या व्यापातूनही, तीच वडिलांची काळजी घेत होती. वडिल मृत्यूपत्र करण्यासाठी आले होते. त्यांनी तिला हळूच बाहेर जायला सांगितले. मग एका कागदावर त्यांनी कोणाला काय काय द्यायचे लिहून आणले होते. त्यातील एका वाक्याने मी आश्चर्यचकित झालो. "मी मुलीला तिच्या लग्नात सगळे काही (म्हणजे दागिने इ.) दिले आहे आणि लग्नाचा खर्चही केला आहे, म्हणून मी तिला काही देऊ इच्छित नाही आणि तिनेही हे गोड मानून घ्यावे". अर्थातच सर्व मिळकती त्यांनी कोणाला दिल्या असतील हे सांगायची गरज नाही. मी त्यांना न राहून विचारले, मुलाचे लग्न कसे केले, त्यावर लगेच ते म्हणाले , अर्थातच धूम धडाक्यात, भरपूर खर्च केला, आमचा एकुलता एक मुलगा आहे तो..
मग मुलीला हाक मारली आणि तिचा हात धरुन पुढच्या डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट साठी निघाले...
आपली स्वकष्टार्जित मिळकत कोणाला द्यायची हा ज्याचा त्याचा हक्क असतो आणि म्हणूनच मृत्यूपत्र करतात. तरीही अशी वाक्ये मला कायमच विचारात पाडतात...असो.
ॲड. रोहित एरंडे. ©
That was a very good article. I really loved the way you explained the articles. HOWEVER, I need your expertise in judging my article, as you are an experienced lawyer. you can also see the articles written by me and give me a review on that Section 341 IPC in Malayalam
ReplyDelete