Posts

Showing posts from September, 2024

#किस्सेकोर्टातले. जिवंतपणी अन्न-अन्न आणि मेल्यावर पिंडदान..- ऍड. रोहित एरंडे ©

 #किस्सेकोर्टातले.  'जिवंतपणी अन्न-अन्न आणि मेल्यावर पिंडदान.." सध्या पितृपंधरवडा चालू आहे. आपल्या पितरांना / पूर्वजांना सद्गती मिळावी असा विश्वास असणारे  पक्ष विधी करत असतात.  मात्र दरवर्षी पितृपंधरवडा सुरू झाला की एक जुनी केस आठवते..आई - वडील गेल्यावर श्राद्ध पक्ष करा किंवा करू नका, पण ते जिवंत असताना तरी त्यांच्याशी नीट वागणे जास्त महत्वाचे आहे हे लक्षात येते. आमच्याकडे एक केस होती. आई - वडिलांचा स्वतःचा बंगला होता आणि त्यात ते सुखाने राहत होते. मुलगा त्याच्या नोकरीसाठी त्याच्या कुटुंबाबरोबर परदेशी राहत होता.. मध्येच त्या मुलाला PhD करायची होती आणि त्याची फी खूप जास्त होती .. म्हणून त्याने आई वडीलांमागे टुमणे लावले की बंगला विकून त्याचा हिस्सा द्यावा. आई - वडिलांनी परोपरीने त्याला सांगितले की त्यांच्या मृत्यूनंतरच तुलाच हि मिळकत मिळेल, अशी भांडणे कशाला करतो आणि हा बंगला त्यांनी अत्यंत कष्टाने बांधला आहे, तिथे उत्तम बाग केली आहे, त्यांच्या नंतर तो त्यालाच मिळेल, पण व्यर्थ.. मुलाचे सल्लागार त्याची बायको आणि बायकोचे भाऊ..   मुलाने आम्हाला सल्ल्यासाठी फोन केला. मी म्हटले तु