Posts

Showing posts from January, 2024

(पण मुलीला ) लग्नात सगळे दिले आहे ना... ॲड. रोहित एरंडे. ©

  #किस्सेकोर्टातले #वंशाचादिवा  #किस्सेमृत्युपत्राचे (पण मुलीला ) लग्नात सगळे दिले आहे ना... ॲड. रोहित एरंडे. © वडिलांना  हाताला धरून ती माझ्या ऑफिस मध्ये आली. वडिलांना बसतानाही धाप लागत होती. सख्खा धाकटा भाऊ परदेशी असल्यामुळे, आपल्या नोकरीच्या  व्यापातूनही,  तीच वडिलांची काळजी घेत होती. वडील उच्चशिक्षित, मोठ्या पदावरून निवृत्त झालेले ! वडिल मृत्यूपत्र करण्यासाठी आले होते. त्यांनी तिला हळूच बाहेर जायला सांगितले.  मग एका कागदावर त्यांनी  कोणाला काय काय द्यायचे लिहून आणले होते.  त्यातील एका वाक्याने मी आश्चर्यचकित झालो.  "मी मुलीला तिच्या लग्नात सगळे काही (म्हणजे दागिने इ.) दिले आहे आणि लग्नाचा खर्चही केला आहे, म्हणून मी तिला काही देऊ इच्छित नाही आणि तिनेही हे गोड मानून घ्यावे".   अर्थातच सर्व मिळकती त्यांनी कोणाला दिल्या असतील हे सांगायची गरज नाही.  मी त्यांना न राहून विचारले, मुलाचे लग्न कसे केले, त्यावर लगेच ते म्हणाले , अर्थातच धूम धडाक्यात, भरपूर खर्च केला, आमचा एकुलता एक मुलगा - वंशाचा दिवा आहे तो.. मग मुलीला हाक मारली...